
Latest Pune News: बी टी कवडे रस्त्यावर अरिहंत ज्वेलर्स मध्ये बंदुकीचा धाक दाखवून तीन जणांनी सोन्याच्या दुकानात दरोडा टाकला आहे. रविवारी रात्री सव्वा नऊ वाजता ही घटना घडली असून यामध्ये दुकानदार किरकोळ जखमी झाला आहे.
बी टी कवडे रस्ता परिसरात बसेरा कॉलनीत वालचंद ओसवाल यांचं सोन्याचं दुकान आहे. वालचंद दुकानात बसले होते, तर मुलगा तुषार चहा आणण्यासाठी जवळच्या चौकात गेला होता. ही संधी साधून रात्री सव्वा नऊ वाजता दुचाकीवर तीन तरुण तोंडाला बांधून आले, दोघेजण दुकानात घुसले, लगेच शटर अर्धे बंद केले.