

Pune News - समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या अमन युसूफ पठाण ऊर्फ खान याच्यासह टोळीतील तिघांवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार मोकांतर्गत केलेली ही ४९ वी कारवाई आहे.
अमन युसूफ पठाण ऊर्फ खान (वय २३, रा. नाना पेठ), आवेज अश्पाक शेख (वय २२, रा. बाबूभाई वाडा, गणेश पेठ) आणि स्वप्नील प्रशांत शिंदे (वय १९, रा. संभाजीनगर, के. के. मार्केट बस स्टॉपजवळ, धनकवडी) अशी मोका कायद्यांतर्गत अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आवेज याने पूर्वीच्या वादातून पाच जुलै रोजी फिर्यादीला मारहाण करून गंभीर जखमी केले. याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी स्वतःच्या टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे केले आहेत.
या पार्श्वभूमीवर वरिष्ठ निरीक्षक सुरेश शिंदे यांनी परिमंडळ-१ चे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्यामार्फत अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांना मोकांतर्गत कारवाईचा प्रस्ताव दिला होता. त्याला पाटील यांनी मान्यता दिली.
पुढील तपास सहायक आयुक्त अशोक धुमाळ करीत आहेत. वरिष्ठ निरीक्षक सुरेश शिंदे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक सुनील रणदिवे, पोलिस अंमलदार संतोष थोरात, किरण शितोळे यांनी ही कारवाई केली. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.