

सावधान! पीएमपी प्रवासात चोरट्यांचा सुळसुळाट; विश्रांतवाडी आणि हडपसरमध्ये दोन महिलांचे दीड लाखांचे दागिने लंपास
sakal
पुणे : पीएमपी बसमधून प्रवास करताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन महिलांचे दागिने लंपास केल्याची घटना विश्रांतवाडी आणि हडपसर गाडीतळ परिसरात घडली. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.