पुणे : पानटपरीवर झालेल्या वादातून तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना कात्रज भागात घडली. शुक्रवारी (ता. ११) रात्री तो साडेदहाच्या सुमारास साई सिद्धी चौकातील (Sai Siddhi Chowk) पानपट्टीवर ही घटना घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharati University Police) एकाला अटक केली.