
वडगावशेरी : खराडीत हाय प्रोफाइल खासगी पार्टीवर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर उच्चभ्रू समजला जाणारा खराडीचा परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या भागातील सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये होणाऱ्या बेकायदा खासगी पार्ट्या, अमली पदार्थ विक्री रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.