Pune Crime : धायरीमध्ये मोबाइलच्या वादातून कामगाराचा निर्घृण खून
Pune Update : धायरीमध्ये मोबाईलच्या कारणावरून दोन कामगारांनी रुममेटला मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी आरोपींना तीन तासांत अटक केली.
पुणे : मोबाइल काढून घेतल्याच्या कारणावरून दोन कामगारांनी सहकाऱ्यास बेदम मारहाण करून खून केल्याची घटना धायरी भागात घडली. नांदेड सिटी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.