Pune Crime News
Pune Crime Sakal

Pune Crime : कोंढवा घरफोडी प्रकरण; सव्वा दोन लाखांचे दागिने व रोकड जप्त

Kondhwa Robbery : कोंढव्यात बंद घराचे कुलूप तोडून तिजोरी फोडणाऱ्या आणि स्वतःच्या दाजीच्या घरातच चोरी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली असून सव्वा दोन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
Published on

पुणे : कोंढव्यातील टेनटेन्स इमारतीमधील बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील तिजोरी फोडणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेले दोन लाख ४६ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली. आरोपीने स्वतःच्या दाजीच्या घरातील तिजोरीवरच डल्ला टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com