Pune Crime: कंपनीतील सहकाऱ्याचा किरकोळ वादातून केला खून; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा, पुण्यातली नेमकी घटना काय?
या घटनेत अमोल गंभीर जखमी झाला. त्यास कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनी उपचारांसाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, कोंढवा पोलिसांनी सूरजविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली.
पुणेः कंपनीत झालेल्या किरकोळ वादातून सहकाऱ्याचा खून करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपीला २० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अतिरीक्त कारावास भोगावा लागणार आहे.