खळबळजनक! पुण्यात भरदिवसा गोळ्या झाडून गुन्हेगाराची हत्या

Pune Crime Murder Shot Dead Criminal lonikand
Pune Crime Murder Shot Dead Criminal lonikand

केसनंद(पुणे) : लोणीकंद (ता. हवेली) येथे काल(ता.9) दुपारी दुचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी जवळून गोळीबार करून सचिन नानासाहेब शिंदे या २९ वर्षीय तरुणाचा खून केला. भरदिवसा हमरस्त्यालगत झालेल्या या घटनेने लोणीकंद गाव परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत लोणीकंद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी बाराच्या सुमारास लोणीकंद येथे नगर हमरस्त्यालगत एटीएम समोर सचिन शिंदे हा तरूण गप्पा मारत थांबलेला असताना दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरापैकी एकाने पाठीमागून त्याच्यावर गोळी झाडली व पलायन केले. थेट डोक्यात गोळी लागल्याने गंभीर जखमी झालेल्या सचिन शिंदे यास स्थानिकांनी तातडीने उपचारासाठी हलवले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान अप्पर जिल्हा अधिक्षक विवेक पाटील, विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील, लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी घटनास्थळी पाहणी करुन स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला अज्ञात हल्लेखोरांबाबत तपासाच्या सुचना दिल्या आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

झेरॉक्सचे पैसे दिले नाही म्हणून अ‍ॅड. असीम सरोदेंनी EDला पाठवली नोटीस!

गोळीबारात मृत्यू झालेल्या सचिन शिंदे या तरूणावरही पूर्वीचे काही गुन्हे दाखल असल्याचे सांगत पोलीसांनी पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाला असण्याची प्राथमिक शक्यता वर्तवली आहे. दरम्यान अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी वेगात शोध मोहिम सुरू केली असून अधिक तपास लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर हे करीत आहेत.


गोळीबार झालेले घटनास्थळ लोणीकंद पोलिस ठाण्यापासून जवळच नगर हमरस्त्यालगत असून भरदिवसा येथे येवून गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेल्यामुळे लोणीकंद परिसरातीलनागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Breaking : व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या पुण्यातील कार्यालयावर EDचा छापा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com