
Crime News : वेल्हेत झालेल्या खुनाला धक्कादायक वळण! सोन्या, चांदीच्या हव्यासापोटी मित्रांनी संपवले
वेल्हे,(पुणे) : वेल्हे तालुक्यात काही दिवसांपूर्वी शिवीगाळ केल्याच्या रागातून दोन भावांनी एका व्यक्तीचा लोखंडी रॉड, वीट आणि लोखंडी वस्तू डोक्यात मारून खून केला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह घर बांधत असलेल्या खड्डय़ात टाकून पुरावा नष्ट करण्यासाठी पुरला होता. सदरची घटना बुधवार ( ता.१८) जानेवारी रोजी उघडकीस आली होती.
मात्र या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबधित व्यक्तीकडे असणाऱ्या सोन्या चांदीच्या हव्यासापोटी हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. वेल्हे पोलिसांनी या घटनेचा समांतर तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून १,८३,७६, १६५/- (एक कोटी त्र्याऐंशी लाख सहयात्तर हजार एकशे पासष्ट ) रूपयाचे वे सोन्याचांदीचे दागीने व रोख रक्कमचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती वेल्हे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली .
या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी नितीन रामभाऊ निवंगुणे, विजय दत्तात्रय निवंगुणे,ओमकार नितीन निवंगुणे आणि पांडुरंग रामभाऊ निवंगुणे अशा चार जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत पावलेल्या विजय काळोखे याने घरातून निघताना सोबत सोने, चांदी आणि रोख रक्कम घेऊन गेला असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. वेल्हे पोलिसांनी त्यानुसार घटनेचा तपास सुरू केला.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी नितीन निवंगुणे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाकी दाखवताच त्याने संपूर्ण घटना क्रम सांगितला.
मयत विजय प्रफुल्ल काळोखे हा घरी सोन्याचांदीचे दागीने व रोख रक्कम घेवुन आला होता ही माहिती त्यांना समजली ते सोन्याचांदीचे दागीने व रोख रक्कम पाहून आरोपी याने लोभ व हव्यासापोटी त्याने संतोषनगर कात्रज येथे स्टिलच्या चिमटयाने मयत विजय प्रफुल्ल काळोखे याचे डोक्यात तोंडावर मारून त्यास जबर जखमी करून त्याचा खुन केला व पुरावा नष्ट व्हावा या उद्देशाने त्याचे प्रेत प्लास्टिक च्या बॅरलमध्ये टाकले.
हा प्रेत असलेला प्लास्टीकचा बॅरल उचलून इनोव्हा कारमध्ये टाकून मौजे रानवडी ता. वेल्हे, जि. पुणे येथे आरोपी नितीन निवंगुणे याचे शेतजमीन गट नं ४० मध्ये आरोपी विजय दत्तात्रय निवंगुणे याचे सहायाने खड्डयात पुरला अशी माहिती त्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. सोने चांदी आणि मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.
आरोपी ओंकार नितीन निवंगुणे त्याच्याकडून रु. १,५६,००,०००/- किमतीचे एकूण २७४३ ग्राम १२० मि.ली. वजनाचे सोन्याचे विटा व दागीने तसेच २९ ग्रॅम ६८० मिली वजनाचे चांदीचे दागीने तसेच १४,२९,७५०रुपये किमतीचे एकूण वजन २८ किलो ५९५ ग्रॅम वजनाची चांदीची भांडी व विटा व आठ लाख रूपये ९.११.४१५ रुपये रोख रक्कम तसेच वापरलेले वाहन ४,००००० तसेच दुचाकी ३५००० असा एकूण १,८३,७६,१६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहा.पोलीस निरीक्षक मनोज पवार हे करीत आहेत.
सदरची कामगीरी ही पोलिस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश पट्टे, उप. विभाग पोलीस अधिक्षक, हवेली विभाग हवेली भाउसाहेब ढोले पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण सहा पोलीस निरीक्षक मनोज पवार व पोलीस उप निरीक्षक महेश कदम व पथकातील अंमलदार सहा फौज सुदाम बांदल, योगेश जाधव , पो. हवा .रविद्र नागटळक, पो. हवा. पंकज मोगे, पो. हवा .ज्ञानदिप धिवार, पो.ना.अजयकुमार शिंदे, पो. का. कांतीलाल कोळपे, आकाश पाटील यांनी केली आहे.