
Pune Crime News : पुण्यात तरुणांचा कोयते फिरवत हैदोस सुरूच; मार्केट यार्ड परिसरात अल्पवयीन...
Pune Crime News : पुण्यात अगोदरच कोयते गँगची दहशत निर्माण झाली होती. त्यात पुन्हा मार्केट यार्ड परिसरात अल्पवयीन मुलांकडून कोयते फिरवत दहशत माजावण्याचे प्रकार घडला आहे. मुलांनी कोयता आणि तलवारी चा वापर करत गाड्यांची तोडफोड केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मार्केट यार्ड भागात असणाऱ्या आंबेडकर नगर येथील पाच ते सहा जणांच्या टोळक्याने मध्यरात्री धुडगूस घातला आहे.
हातात कोयते आणि तलवारी घेऊन दहशत माजवत लोकांना दुकाने बंद करण्यास सांगितले. एवढेच नाही तर दुचाकी गाड्यांची तोडफोड देखील केली आहे.
हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'
या प्रकारानंतर सर्व आरोपी हातात कोयते आणि तलवारी नाचवत त्या ठिकाणाहून पसार झाले. या गँगमध्ये सर्व तरुण हे अल्पवयीन होते. मार्केटयार्ड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा: Old Vehicles : पुण्यात जुन्या गाड्यांना सोन्याचा भाव; जुनं ते सोनं करण्याची किमया
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने अक्षरशः धुमाकूळ घालून पोलिसांच्या नाकी नऊ आणल्या होत्या. पुण्यातील वेगवेगळ्या भागात कोयता गँग सक्रिय होती.
अजूनही पुण्यात सर्रास दहशत माजवण्याचा प्रकार काही थांबायचं नाव घेत नाहीये. यामुळे स्थानिक दुकानदारांमध्ये आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.