Khadki Theft
sakal
पुणे : खडकी परिसरात चरण्यासाठी सोडलेले गाय, वासरू व गोऱ्हा असे ८० हजार रुपये किमतीची जनावरे अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पळवून नेली. ही चोरीची घटना शनिवारी (ता. १३) रात्री सात ते पहाटे ३ वाजेच्या सुमारास चिखलवाडी, खडकी परिसरात घडली. याप्रकरणी खडकी परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय व्यक्तीने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरटयांवर गुन्हा दाखल केला आहे.