mother kills son Pune Manchar incident
esakal
मंचर (पुणे) : मंचर (ता. आंबेगाव) शहरात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना आज, शुक्रवारी (ता.३) सकाळी सुमारे सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास तपनेश्वर स्मशानभूमीजवळ (Pune Crime News) घडली. कौटुंबिक वादातून विवाहित महिलेने स्वतःच्या १४ वर्षीय मुलीचा गळा दाबून ती मृत झाल्याचा समज करून घेतल्यानंतर सहा वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन विहिरीत उडी घेतली. या दुर्दैवी घटनेत सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला असून आई व मुलगी जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत.