मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंना अटक, 5 कोटींच्या फसवणूकीचा आरोप

अटक
अटकe sakal
Updated on

Pune Crime news : पाच कोटी रुपयांच्या फसवणूकीचा आरोप असलेला मराठा ज्वेलर्सचा माजी भागीदार प्रणव मराठे यांना अटक करण्यात आली आहे. केथरुड पोलिसांनी (Kothrud Police) ही कारवाई केली आहे. मराठे ज्वेलर्सच्या (marathe jewellers) योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा मिळेल, असे आमिष प्रणव मराठे यांनी दाखवून ठेवीदारांची पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने प्रणव मराठे यांना 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

26 वर्षीय प्रणव मिलिंद मराठे याला तपासासाठी वेळोवेळी पोलिस स्थानकात हजर राहण्याच्या नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, प्रणवकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया न आल्यामुळे कोथरुड पोलिसांनी अखेर प्रणवला अटक केली आहे. ठेवीदारांची पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी या प्रकरणी कौस्तुभ अरविंद मराठे, मंजिरी कौस्तुभ मराठे , नीना मिलिंद मराठे आणि इतरांविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच आत्महत्या केलेले मराठे ज्वेलर्सचे मिलिंद उर्फ बळवंत अरविंद मराठे यांच्यावरही फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.

अटक
CM उद्धव ठाकरेंचा जनतेला मोठा इशारा, घेतला सर्वात मोठा निर्णय

59 वर्षीय शुभांगी विष्णू कुटे यांनी ठेवीदारांच्या फसवणूक झाल्याबाबतची तक्रार पोलिसांत दिली होती. लक्ष्मी रोड तसेच पौड रोड कोथरूड येथील प्रणव मराठे ज्वेलर्सच्या शाखांमध्ये 14 जानेवारी 2017 ते जानेवारी 2021 या कालावधीत फसवणूकीचा प्रकार घडल्याचं तक्रारी म्हटलेय. तर सहायक सरकारी वकील एम.बी वाडेकर यांनी युक्तीवादादरम्यान सांगितले की, सर्व गुंतवणुकदार ज्येष्ठ नागरिक असून त्यांच्या आयुष्यभराची कमाई गुंतवणूक म्हणून दिली आहे. आरोपीने गुंतवणूकदारांची रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचे तसेच व्यापारात सक्रिय सहभाग असल्याचे दिसून येत आहे.

अटक
पुण्यासह सात जिल्ह्यांनी महाराष्ट्राची चिंता वाढवली
अटक
श्रेयस तळपदे विरोधात चोरीचा आरोप, पोलिसांत तक्रार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mundhwa Botanical Garden Project Under Scanner Over Proposed Tree Cutting
Admission Confusion to End as Maharashtra Sets Up District-Level Student Help Centers
ISRO-CWPRS Agreement Aims to Track River Pollution and Dam Health in Real Time
Speeding Tanker Overturns on Katraj Bypass, Beed Native Dies in Tragic Accident
Marathi News Esakal
www.esakal.com