

Three accused were arrested while police launched a search for five absconding suspects in the gambling case.
Sakal
दिवे घाटाच्या पायथ्याशी ट्रकखाली चिरडून तरुणाचा मृत्यू
पुणे : हडपसरकडून सासवडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिवे घाटाच्या पायथ्याशी ट्रकचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून एका तरुणाला चिरडल्याची घटना रविवारी घडली. या अपघातात या तरुणाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिस अंमलदार सचिन खेंगरे यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंदनकुमार गिरिजाशंकर गौतम (वय ३१, रा. जेजुरी, ता. पुरंदर, मूळ रा. उत्तर प्रदेश) या ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. आंबेकर लॉन्सच्या समोरील एका टपरीजवळ ट्रकचालक चंदनकुमार याने वाहन सुरू केले. त्यावेळी ट्रकचे पुढील डावे चाक तरुणाच्या पोटावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक कोमल जाधव पुढील तपास करत आहेत.