Pune Crime News : ओळख, ब्लॅकमेल बलात्कार अन् जबरदस्तीने लग्न; तरुणीची कंटाळून पोलिसांत धाव | Pune Crime News Woman blackmailed and forcefully married by a man registers police complaint | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

woman cheating
Pune Crime News : ओळख, ब्लॅकमेल बलात्कार अन् जबरदस्तीने लग्न; तरुणीची कंटाळून पोलिसांत धाव

Pune Crime News : ओळख, ब्लॅकमेल बलात्कार अन् जबरदस्तीने लग्न; तरुणीची कंटाळून पोलिसांत धाव

पुण्यातील कॉलेजमध्ये शिकत असलेल्या तरुणीशी एका तरुणाने जबरदस्तीने लग्न केल्यानंतर लॉजवर नेऊन बलात्कार केला. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दिली असून नागेश चव्हाण (२३) या तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आरोपी नागेश याने फिर्यादी तरुणीशी ओळख केली आणि तिच्यावर आपले प्रेम आहे असे भासवून तिचा विश्वास संपादन केला. यानंतर त्याने त्या तरुणीला पुणे सातारा रस्त्यावर असलेल्या एका लॉजमध्ये नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शरारिक संबंध ठेवले आणि ब्लॅकमेल करत फोटो, व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी देखील दिली.

त्यानंतर आरोपीने पीडित तरुणी शिकत असलेल्या कॉलेजच्या बाहेर जाऊन तिच्याशी भेटून तिला लग्नाची मागणी करू लागला. तरुणीने लग्नास दिल्यानंतर त्याने "मी फिनेल पिऊन जीव देईल" अशी धमकी दिली आणि तरुणीला जबरदस्तीने सोलापूर येथे नेऊन तिच्याशी लग्न केले.

तरुणी कारण देऊन पुन्हा वडिलांच्या घरी राहायला आली असता पुन्हा आरोपीने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. या सगळ्या जाचाला कंटाळून अखेर त्या तरुणीने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांकडून या आरोपीचा शोध घेतला जात आहे

टॅग्स :Pune Crime News