Nigerian National Killed in Pisoli Over Love Affair
Sakal
पुणे : प्रेमप्रकरणाच्या कारणावरून नायजेरियन नागरिकांमध्ये झालेल्या हाणामारीत एका नायजेरियन नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना पिसोळी येथील बालाजी पद्मावतीनगर परिसरात सोमवारी (ता. १२) पहाटे घडली. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.