Crime : लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध; लग्नासाठी आग्रह केल्यास विष पाजून घेतला जीव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Crime : लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध; लग्नासाठी आग्रह केल्यास विष पाजून घेतला जीव

कोंढवळ : या पष्चिम आदिवासी भागातील येथील युवकाने अल्पवयीन मुलीबरोबर शारिरीक संबंध ठेवले. तिनं लग्न कर अशी वारंवार मागणी केली असता तिला पळवून नेले. जबरदस्तीने विष पाजून जिवंत ठार केले . याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली अशी माहिती घोडेगाव पोलिसांनी दिली. याची तक्रार घोडेगाव पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या आईनेे दिली आहे.

याबाबत घोडेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी , रोहिदास जीवन कारोटे (वय - २१. रा. कोंढवळ, पो. तळेघर, ता. आंबेगाव) व अल्पवयीन मुलीचे सुमारे दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. तिला त्याने लग्नाचे आमिश दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. त्यावेळी तिनं त्यास लग्न करू असे वारंवार मागणी केली. कारोटे यांस लग्न मान्य नसल्याने व त्यास ति आवडत नसल्याने त्याने तिला आपले लग्न होत नाही.

आपण आत्महत्या करू असे सांगितले. त्यानंतर घोडेगाव येथील एका दुकानातुन उंदीर मारण्याचे औषध आणले. १३ नोव्हेंबर रोजी तळेघर येथील हॉटेलमधून पेठा घेतला त्यात उंदीर मारण्याचे औषध मिसळले व मुलीला घराबाहेर शेतात बोलवले . तो पेढा तिला खाऊ घातला. त्या औषधाचा तिच्यावर परिणाम होत नाही ती मरत नाही. असं पाहून त्याने तिला पुण्याला पळुन नेले व नातेवाईकांकडे राहिले. तेथे असताना तिला उलटया झाल्या त्यावेळी त्याने तेथील स्थानिक दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी दिलेल्या गोळया औषधे त्याने तिला दिले नाही. १९ नोव्हेंबर रोजी तिने पाणी मागीतले असता कारोटे याने तिला उंदराचे औषध घातलेला पेढा देवून ठार केले.

याबाबत रोहिदास कारोटे याने मुलीने आत्महत्या केली असल्याचे घोडेगाव पोलीसांना सांगितले. पोलीसांना कोणतेही सहकार्य तपासात करत नव्हता. घोडेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्षनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, पोलीस हवालदार मनिषा तुरे यांनी संबंधित खुनाचा तपास केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :Pune Newspunecrimemurder