
Latest Shukravar peth News: मेफेड्रोन बाळगणाऱ्या सरार्इतांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ लाख ६० हजारांचे मेफेड्रोन, पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत. अटक केलेले आरोपी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना चौकशीत मिळाली.
बॉबी भागवत सुरवसे (वय २८, रा. गजराज हेल्थ क्लबजवळ, लक्ष्मीनगर येरवडा) आणि तौसिम ऊर्फ लड्डू रहीम खान (वय ३२, रा. कसबा पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.