Video : पुण्यात PMT चालकाला अश्लील शिवीगाळ करत तरूणाकडून बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime

Video : पुण्यात PMT चालकाला अश्लील शिवीगाळ करत तरूणाकडून बेदम मारहाण

पुणे : एका तरूणाने पी. एम.पी.एम.एल. बस चालकाला अश्लील शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना पिंपरी चिंचवड भागात घडली. बसच्या आडवी येणारी दुचाकी काढायला सांगितली म्हणून या तरुणाने थेट बसमध्ये चढून चालकाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

(Pune Crime News Latest Updates)

हेही वाचा - विमा पाॅलिसींचे डी-मॅट पाॅलिसीधारकांनाच पोहचवेल नुकसान?

अधिक माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील नेहरूनगर परिसरातील संतोषी माता चौकामध्ये भर दिवसा हा प्रकार घडला आहे. ऋषिकेश घोडेकर असं या तरुणाचे नाव असून, तुला माहित आहे का, मी कोण आहे ? असं म्हणत किरकोळ वादातून या तरुणाने बस मध्ये प्रवेश करत बस चालकाला बेदम मारहाण केली आहे.

टॅग्स :Pune Newscrimepmt