पालखी सोहळ्याच्या मानाच्या वादातून तरूणावर वार करणारे अटकेत

गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने पाच जणांना अटक केली.
Arrested
Arrested

पुणे : गावातील पालखी सोहळ्याचा मान घेण्याच्या वादातुन टोळक्‍याने तरुणाला पिस्तूलाचा धाक दाखवून त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने पाच जणांना अटक केली. यवत गावातील पालखीच्या मानाच्या वादातून हा प्रकार घडला होता. (Pune Crime News)

सागर माधवराव दोरगे (वय 29,रा. पाटील वस्ती यवत), अक्षय ईश्वर यादव (वय 27,रा. यादववाडी यवत), अभिषेक संतोष दोरगे (वय 24,रा. पिंपळाची वाडी यवत), हर्षल बाळू जगताप (वय 22,रा. कासुर्डी कामतवाडी यवत), विजय अनिल टेमगिरे (वय 25,रा.भरतगाव यवत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. किरण गायकवाड असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Arrested
बारामती : लाचप्रकरणी वडगाव निंबाळकरचे दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात

संशयित आरोपी दोरगे व गायकवाड हे यवत गावातील रहिवासी आहेत. त्यांच्यात अनेक वर्षांपासून गावातील पालखीच्या मानावरू वाद आहेत. गायकवाड हा 6 फेब्रुवारी रोजी त्याच्या मित्रांसमवेत जेजुर येथे दर्शनासाठी गेला होता. तेथुन परत येत असतानाच सागर व त्याच्या साथीदारांनी किरणला अडवून त्याला पिस्तुलाचा धाक दाखविला. त्यानंतर त्यांनी किरणवर कोयत्याने वार केले. या घटनेनंतर आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करीत, हत्यारे उंचावुन दहशत निर्माण केली.

त्यामुळे नागरीकांनी घाबरुन त्यांची दुकाने बंद केली. दरम्यान, संबंधीत गुन्ह्यातील आरोपी फरारी झाले होते. हे आरोपी त्यांच्या कारमधून लोहीयानगर येथे त्यांच्या एका मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची खबर गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकास मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींना पुढील कारवाईसाठी यवत पोलिसांच्या ताब्यात दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com