Pune Crime : पोलिसांनी दोन तास सिने स्टाईलने पाठलाग करून डिझेल चोरांना नागरिकांच्या मदतीने पकडले

९५ लिटर डिझेल जप्त केले आहे.
Pune Crime
Pune Crime sakal

जुन्नर - तेजेवाडी ता.जुन्नर येथून ट्रक मधील डिझेलची चोरी करून पळून जाणाऱ्या चोरट्यांना जुन्नर व ओतूर पोलिसांनी पाठलाग करून नागरिकांच्या मदतीने मढ ता.जुन्नर येथे दोन तासानंतर पकडण्यात यश मिळविले आहे. ही घटना ता.२४ रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.

Pune Crime
Mumbai Local News : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनी थांबवली एसी लोकल, कारण...

याबाबत सोपान विष्णू नायकोडी रा.तेजेवाडी यांनी जुन्नर पोलीसांकडे दिलेल्या फिर्यादीत त्यांच्या मालकीच्या एल पी गाडी क्रमांक एमएच०४एच९७८६ व एमएच१२सीटी६०४७ या गाडीचे डिझेलचे टाकीचे झाकण उचकटून त्यातील डिझेल चोरी झाले असल्याचे नमूद केले आहे.पोलिसांनी नरेश भाऊ मोरे व दिनेश विठ्ठल शेळके दोघे रा.कलमबाड मुरबाड,जि.ठाणे यांना महिंद्रा पीक क्रमांक एमएच ०५ डीके २२६१ ह्या वाहनासह व त्यांचेकडे तीन डिझेल कॅन व ९५ लिटर डिझेल जप्त केले आहे.

Pune Crime
Pune : बोअरमध्ये पाणी किती? पुणेकरांच्या अनोख्या स्टार्टअप मध्ये बोअरवेलच्या तळाचा ठाव घेणारे संशोधन

पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार ओतूर पोलीस गस्त घालत असताना त्यांना तेजेवाडी येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या संशयास्पद वाहनास हटकले असता त्यानी जुन्नरच्या दिशेने पळ काढला.पोलीस उपनिरीक्षक शेळके यांनी जुन्नर पोलिसांना कळविले त्यानुसार सदरचे वाहन जुन्नरच्या प्रवेशद्वारातून जात असताना अडविण्याचा प्रयत्न केला.

पण ते वेगात पुढे गेल्याने जुन्नर पोलिसांच्या दुसऱ्या वाहनाने ते चार किलोमीटर अंतरावर पंचलिंग चौकात अडविण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांना हुल देत ते गणेशखिंड मार्गे पुढे जात असल्याचे दिसताच पोलिसांनी मढ ग्रामस्थाना ते अडविण्यास सांगितले त्यानी रस्त्यात लाकडे दगडी व वाहने लावल्यामुळे वाहन पुढे जाऊ शकले नाही.यामुळे आरोपी मुद्देमालासह ताब्यात घेतले.त्यानी चोरलेले सुमारे १०० लिटर डिझेल सांडले असल्याचे आढळून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com