First Arrest Made in High-Profile Robbery at Pooja Khedkar’s Residence
Sakal
पुणे
Puja Khedkar Robbery : पूजा खेडकर दरोडा प्रकरण; नेपाळी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; मुलाचाही गुन्ह्यात समावेश असल्याची माहिती!
Robbery Accused Arrested : बडतर्फ आयएएस पूजा खेडकर यांच्या औंध येथील बंगल्यात दरोडा टाकणाऱ्या टोळीतील एकाला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. आरोपीने कुटुंबीयांना बेशुद्ध करून लुटल्याचे तपासात समोर आले आहे.
पुणे : औंध येथील नॅशनल हाउसिंग सोसायटीमधील वादग्रस्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बंगल्यात दरोडा टाकल्याप्रकरणी एकास चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
