
पुणे : कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत २५ वर्षीय महिलेवर तिच्याच घराच्या दरवाजात अज्ञात व्यक्तीने चेहऱ्यावर स्प्रे मारून बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकारानंतर आरोपीने पीडितेच्या मोबाईलमध्ये स्वतःचा सेल्फी काढत 'मी पुन्हा येईन' असे लिहून ठेवले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, महिलांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.