
पुणे : भावाच्या जन्मपत्रिकेवर तोडगा काढण्याच्या बहाण्याने एका ज्योतिषाने तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना धनकवडी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ज्योतिषाला अटक केली आहे. न्यायालयाने या ज्योतिषाला रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.