
Pune Crime : मोठ्या बहिणीचेच लहान बहिणीसोबत अश्लील कृत्य; धक्कादायक घटनेने पुण्यात खळबळ!
पुणे - पुण्यातील गुन्हेगारी मागील काही दिवसांपासून वाढली आहे. अनेक धक्कादायक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. त्यातच मोठ्या बहिणीकडून लहान बहिणीवर जबरदस्ती करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील विमाननगर परिसरात ही घटना घडली आहे. (Pune Crime News in Marathi)
मिळालेल्या माहितीनुसार, या दोघीही सख्या बहिणी आहेत. मोठ्या बहिणीचे वय २४ वर्ष असून तिने तिच्याच १८ वर्षीय बहिणीशी अश्लील कृत्य केले. या प्रकरणी पोलिसांनी २४ वर्षीय मोठ्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २२ जानेवारी रोजी रात्री विमाननगर येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडला.
या दोघीही बहिणी एकत्र राहतात. लहान बहिण घराच्या हॉलमध्ये झोपली असताना मोठ्या बहिणीने लहान बहिणीच्या शरीरावरून हात फिरवीत अश्लील कृत्य करायला सुरुवात केली. त्यानंतर दोघींमध्ये वादावादी झाली. तरीही मोठ्या बहिणीने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र लहान बहिणीने वारंवार कृत्याला विरोध केला. या दोघींमधील वाद वाढल्यानंतर लहान बहिणीने थेट पोलिसांत तक्रार दिली.
तक्रारदार तरुणी सध्या बारावीमध्ये शिक्षण घेत असून मोठी बहीणीचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले असून तिचे लग्नही झाले आहे. मात्र ती वडिलांकडेच राहते. मोठ्या बहिणीने केलेल्या गैरप्रकारबाबत तक्रार देण्यासाठी लहान बहीण पोलिस ठाण्यात आली होती. तिने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.