Pune Crime : रात्री उशिरापर्यंत पान टपरी चालू ठेऊ नका, अशी सूचना देताच पोलिसांवर दगडफेक

three drunk policemen rioted in a hotel for more alcohol pune crime news
three drunk policemen rioted in a hotel for more alcohol pune crime news

पुणे - शांत शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात पोलिसांच्याच गाडीवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री उशिरापर्यंत पान टपरी चालू ठेऊ नका हे सांगायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडु हाके हे स्वतः रात्री गस्त घालत असताना हा सगळा प्रकार घडला आहे. पुण्यातील वारजे माळवाडी येथे १४ तारखेला रात्री हा संपूर्ण प्रकार घडला. (Pune Crime news in Marathi)

three drunk policemen rioted in a hotel for more alcohol pune crime news
Crime News : पुणे पोलिसांकडून बनावट कॉल सेंटर उध्वस्त; लोनच्या नावावर व्हायची फसवणूक

दिग्विजय काकाराम वाघमारे, व्यंकटेश प्रमोद पिळवणकर, अमोल निलेश पवार, लाल्या खान, आप्पा लोंढे, खंड्या वाघमारे यांच्यासह इतर जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके हे त्यांच्या कर्मचारी सोबत त्या भागात गस्त घालत होते. यावेळी त्यांना गणपती माथा येथील रॉयल पान शॉप रात्री उशिरा पर्यंत सुरू असल्याचे दिसून आले. टपरी बंद करा आणि घरी जा असं पोलिसांनी सांगितल्यानंतर गर्दीत असलेल्या आरोपींनी जमाव करून पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली आणि पळून गेले. या घटनेत सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत

हेही वाचा काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com