

इंदापूर, ता. ४ : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील इंदापूर, बारामती, वालचंदनगर, दौंड, भिगवण यासह सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, करकंब या भागात घरफोडी, जबरी चोरी व वाहन चोऱ्या करणाऱ्या एका कुख्यात टोळीतील तीन आरोपींनी स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. यामध्ये इंदापूर येथे एका विधी संघर्ष बालक व इतर दोन, असे तीन आरोपी आहेत. त्यांच्याकडून विविध पोलिस ठाण्यातील १२ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. यामध्ये तब्बल १५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व पथकाने ही कारवाई केली. यामध्ये पोलिस पथकाने गस्तीदरम्यान इंदापूर येथे पुणे-सोलापूर बाह्यवळणावरील ‘जगदंब’ हॉटेलजवळ सापळा रचून मोबाईल उर्फ हरी पवार आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची मोटारसायकल व इतर गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच, वडगाव निंबाळकर येथील जबरी चोरीप्रकरणी शक्तिमान हुबऱ्या काळे यालाही अटक करण्यात आली.
या आरोपींकडून सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने, दोन मोटारसायकल व मोबाईल, असा एकूण १५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे इंदापूर, दौंड, वालचंदनगर, भिगवण, वडगाव निंबाळकरसह सोलापूर ग्रामीणमधील (पंढरपूर व करकंब) असे एकूण १२ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, इंदापूरचे पोलिस निरीक्षक विलास नाळे, वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनकडील सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन मोहिते, सुधीर वाळुंज, बाळासाहेब कारंडे, विनोद भोकरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार शिवाजी निकम, किशोर तेलंग, सचिन होळकर, गुलाबराव पाटील, स्वप्निल अहिवळे, पोपट नाळे, शैलेश स्वामी, सुलतान डांगे, तुषार चव्हाण, गणेश डेरे, रहीस मुळानी, राजू मोमीन, अतुल डेरे, चेतन पाटील, भारत मोहोळ, इंदापूर पोलिस ठाण्याचे अंमलदार संतोष शिंदे, अंकुश माने, राहुल शिंदे, लक्ष्मण सूर्यवंशी, योगेश कर्चे, विनोद लोखंडे, सचिन नांगरे, अण्णा कोळेकर व वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याकडील पोलिस अंमलदार यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास दौंड पोलिस करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.