
पिंपरी : पार्सल देण्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या प्रौढाने हँडगनच्या धाकाने ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघा भावांनी प्रतिकार करून त्याला पकडले. पिंपळे गुरवमधील कल्पतरू इस्टेट सोसायटीतील फेज तीनमध्ये हा प्रकार घडला. प्रौढाने आयटी कंपनीतील नोकरी गेल्याने लुटण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.