
Pune Crime
Sakal
पुणे : आयुष कोमकर याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी आरोपी यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील इतर आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.