Dispute Over Curry Leaf Bundles Turns Violent
Sakal
पुणे
Crime News Pune : कढीपत्त्याच्या जुड्यांवरून राडा! थेऊर फाटा परिसरात भाजी विक्रेत्याला टोळक्याकडून बेदम मारहाण
Vegetable Seller Assault : पुण्यातील थेऊर फाटा परिसरात कढीपत्त्याच्या बंडलवरून झालेल्या वादातून एका भाजी विक्रेत्याला आणि त्याच्या भावाला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
पुणे : भाजी विक्रेत्याला मारहाण करण्यात आल्याची घटना थेऊर फाटा परिसरात शुक्रवारी घडली असून या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत भाजी विक्रेता अक्षय अशोक चव्हाण (वय ३४, रा. जाधव वस्ती, थेऊर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

