
पुणे : प्रेमसंबंधास विरोध केल्याने एका व्यक्तीला दोघांनी बांबूने बेदम मारहाण करून त्याचा खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कात्रज येथील गुजरवाडी परिसरात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना तत्काळ अटक केली.