Pune Crime: व्यावसायिक सतीश वाघ यांच्या खूनप्रकरणी दोन संशयित ताब्यात

Latest Pune News: सुपारी देऊन खून केल्याचा संशय, कारण अद्याप स्पष्ट नाही
 Crime
Crime sakal
Updated on

Pune: बी.टी. कवडे रस्ता परिसरातील हॉटेल व्यावसायिक सतीश सादबा वाघ (वय ५५) यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी (ता. १०) दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. वाघ यांचे अपहरण केल्यानंतर खून करून त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून आरोपी पसार झाल्याचे चौकशीत समोर आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी पुण्यातील फुरसुंगी आणि धुळे शहरातील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या इतर दोन साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. वाघ यांचा खून खंडणीसाठी नव्हे तर, तो इतर कारणामुळे सुपारी देऊन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com