पुणे : अनैसर्गिक संबंधावरून झालेल्या वादातून एका अनोळखी व्यक्तीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने अवघ्या २४ तासांत शिताफीने शिरूर येथून अटक केली. ही घटना मंडई मेट्रो स्टेशनच्या समोरील इमारतीच्या पार्किंगमध्ये बुधवारी (ता. ४) घडली.