Missing Youth Case Turns into Fatal Assault Investigation
Sakal
पुणे : पूर्ववैमनस्यातून विश्रांतवाडीतील एका १७ वर्षीय युवकाचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट तीन आणि विश्रांतवाडी पोलिसांनी कर्नाटकातील बेळगाव येथून दोघा तरुणांना अटक केली असून, इतर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.