Incident Details: Senior Citizen Attacked in Wagholi Society
पुणे : वाघोलीतील सोसायटीच्या आवारात अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलाला हटकल्याने ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना वाघोली परिसरात सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान वाघोलीतील सिल्वर क्रीस्ट सोसायटी येथे घडली. याप्रकरणी आरोपी तरुणाविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.