
चाकण : खराबवाडी (ता. खेड) येथे प्रियकराने केलेल्या जबर मारहाणीत प्रेयसीचा मृत्यू झाला. तसेच, तीच्या मुलांनाही प्रियकराने मारहाण केली. अंतिमा पांडे (वय ३८), असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, या प्रकरणी आरोपी सचिन रामआसरे यादव (वय २३, मूळ रा. चंपापूर ता. हडीया, जि. अलाहाबाद, उत्तर प्रदेश, सध्या. रा. चाकण, ता. खेड) याला अटक केली आहे.