Pune : मर्जीतील अधिकाऱ्यांना 'क्रिम पोस्ट, काही बदल्या राजकीय सुडापोटी; कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रकार

पुणे बाजार समितीत फळे-भाजीपाला, गुळ भुसार, मांजरी, पिंपरी, मोशी, उत्तमनगर उपबाजार आदी विभाग ही प्रमुख पदे महत्त्वाची मानली जातात.
Pune
Punesakal

पुणे - कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या (हवेली) निवडणुकीनंतर नवनियुक्त संचालक मंडळाने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. काही ठराविक अधिकाऱ्यांना साइड पोस्टिंग देत मर्जीतील अधिकाऱ्यांना 'क्रिम पोस्टिंग दिल्या आहेत. तर काही बदल्या राजकीय सुडापोटी केल्या असल्याची चर्चा बाजारात सुरू आहे.

Pune
Mumbai : तळीरामांचा प्रताप! दारू पिताना हटकल्याने पोलिसांवर हल्ला; आरोपींना अटक

पुणे बाजार समितीत फळे-भाजीपाला, गुळ भुसार, मांजरी, पिंपरी, मोशी, उत्तमनगर उपबाजार आदी विभाग ही प्रमुख पदे महत्त्वाची मानली जातात. समितीच्या प्रशासकीय कालखंडात विभागाच्या प्रमुख पदी सेवाज्येष्ठता डावलून कनिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांची वर्णी लावली होती. नवनियुक्त संचालक मंडळानेदेखील काही ठराविक बदल्या वगळता पुन्हा तोच कित्ता गिरवला आहे.

Pune
Pune Crime: मास्क काढायला सांगितल्यानं तरुणाची हत्या! 15 दिवसानंतर उकललं गूढ

निवडणूकीत विरोधकांच्या जवळील कर्मचाऱ्यांच्या दुय्यम ठिकाणी बदल्या करून निवडणुकीतील राग बदल्यांच्या माध्यमातून काढल्याची चर्चा आहे.काही अधिकारी अनेक वर्षे पदांवर ठाण मांडून बसले होते. मात्र आता नवनियुक्त संचालक मंडळाने बदल्या सुरू केल्या आहेत. यामुळे अनेकांना या बदल्या अडचणीच्या ठरल्या आहेत.

काही अधिकारी आपल्या मर्जीतील संचालक निवडून येतील आणि आपल्याला अभय मिळेल या अविर्भावात होते. मात्र ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या मर्जीतील संचालकांचा पराभव झाल्याने हे अधिकारी नाराज झाले होते. यामुळे त्यांना आता बदलीला सामोरे जात दुय्यम ठिकाणी रुजू होण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

बाजार समितीमध्ये वर्षानुवर्षे बदल्या झाल्या नव्हत्या. आता नियमाप्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

- दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.

Pune
Non Veg Restaurant In Mumbai : मुंबईमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीचे चविष्ट मांसाहारी जेवण कुठे खाण्यास मिळेल?

वशिलेबाजीमुळे कनिष्ठ कर्मचारी निर्धास्त

मार्केटयार्ड फुलबाजार, पिंपरी, भरारी पथक, विद्युत, कोरेगाव मुळसह इतर काही विभागांच्या प्रमुख पदी कनिष्ठ कर्मचारी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसले आहेत. नवनियुक्त संचालक मंडळातील काहींचे जवळचे नातेगोते संबंध असल्यामुळे वरिष्ठांची जागा अडवलेले अनेक कनिष्ठ कर्मचारी निर्धास्त झाले आहेत. यावरून संचालक मंडळाचा सेवा ज्येष्ठतेचा दावा खोडून निघाल्याची देखील चर्चा आहे.

Pune
Mumbai Police : ट्विटरद्वारे मुंबईत घातपाताची मुंबई पोलिसाना धमकी.. नांदेडमधून एकाला अटक...

बाजारात निवडणुकीत दुसऱ्या उमेदवाराचे काम केल्याच्या रागातून ठराविक पाच तोलणारांच्या बदल्या केल्या आहेत. यासाठी एक संचालक निवडून आल्यापासून सभापतींच्या दालनाला चकरा मारत होता. मात्र, सभापतींनी बदल्यांना परवानगी दिली नसताना देखील विभाग प्रमुखांनी आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी संचालकाच्या दबावाला बळी पडत बदल्या केल्याची माहिती आहे. त्यामुळे सभापतींपेक्षा संचालकच वरचढ असल्याची चर्चा जोरात आहे.

कोणाची मर्जी राखायची यावरून रस्सीखेच

गूळ भुसार बाजार विभाग प्रमुख रामदास सावंत यांची निवड झाली होती. पुन्हा गूळ भुसार विभाग प्रमुख पदी महादेव शेवाळे यांची वर्णी लावली. त्यामुळे कोणाची मर्जी राखायची यावरून जोरदार रस्सीखेच सुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com