
मोहोळ : पुण्याच्या हडपसर पोलिसांनी अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या एका सराईत गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी पथक पाठवले होते. सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी येथे पोहोचल्यावर संशयित आरोपीने स्वतःच्या पिस्तुलातून पोलिसांवर गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या प्रत्युत्तर गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.