Rising Scams in Online Hotel Booking and Remote Job Tasks
sakal
पुणे : शेअर बाजारातील गुंतवणुकीवर भरघोस परतावा, घरातून ऑनलाइन कामाची संधी, तसेच तातडीने कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांकडून नागरिकांना गंडविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. शहरातील शिवाजीनगर, भवानी पेठ, कात्रज, बिबवेवाडी, कोंढवा आणि पाषाणमधील नागरिकांची सुमारे एक कोटी ३० लाख रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.