Pune Cyber Crime: सायबर फसवणुकीतून कोटींची लूट; शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल
Pune Registers 13 Cyber Fraud Cases in a Single Day: पुण्यात सायबर चोरट्यांचा कहर सुरूच असून वेगवेगळ्या १३ प्रकरणांत तब्बल १.६१ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. शेअर बाजार, वर्क फ्रॉम होम आणि लिंकच्या आमिषाने नागरिकांना गंडा घातला आहे.
पुणे : सायबर चोरट्यांकडून फसवणूक झाल्याप्रकरणी शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत १३ गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणांमध्ये सायबर चोरांनी एक कोटी ६१ लाख ९८ हजार ९५२ रुपयांची फसवणूक केली.