Pune News : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; ज्येष्ठ महिलेला एक कोटींचा गंडा

पुण्यात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर भामट्यांचा सुळसुळाट झाला असून, एका ज्येष्ठ महिलेला एक कोटी रुपयांचा गंडा घातल्यासह अन्य तिघांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे.
Senior Citizen From Kondhwa Scammed for ₹1 Crore via Share Market Lure

Senior Citizen From Kondhwa Scammed for ₹1 Crore via Share Market Lure

sakal
Updated on

पुणे : शेअर मार्केट आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांकडून शहरात फसवणुकीचे सत्र सुरूच आहे. कोंढव्यातील एका ज्येष्ठ महिलेची एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याशिवाय ‘डिजिटल अरेस्ट’, क्रेडिट कार्ड आणि बिटकॉइन गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com