सायबर फसवणुकीतील रक्कम आठ दिवसांत हस्तगत

सायबर फसवणुकीतील 
रक्कम आठ दिवसांत हस्तगत
Published on

पुणे, ता. २१ : सायबर चोरट्यांनी मोबाईल अपडेटचा बनावट संदेश पाठवून लांबविलेले ५० हजार रुपये येरवडा पोलिसांनी नागरिकाला परत मिळवून दिले. बँकेशी तत्परतेने पत्रव्यवहार आणि तांत्रिक पाठपुरावा करून पोलिसांनी अवघ्या आठ दिवसांत ही यशस्वी कामगिरी केली.
येरवडा परिसरातील एका व्यक्तीला मोबाईल अपडेटचा बनावट संदेश पाठवून सायबर चोरट्यांनी त्यांचे खाते हॅक केले होते. या माध्यमातून खात्यातून ५० हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आले. फसवणूक झाल्याचे समजताच संबंधित व्यक्तीने येरवडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर तपास पथकाने तातडीने हालचाली केल्या. पोलिसांनी संबंधित बँकेशी दूरध्वनी आणि ईमेलद्वारे संपर्क साधून तो व्यवहार तत्काळ गोठवला. पोलिसांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तक्रारदाराची पूर्ण रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत आणि सहाय्यक आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com