
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा समाधानकारक पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये एकूण 70.05% पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 44% जास्त पाणीसाठा असल्याने पुणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, अशी आशा आहे.