‘पुणे दर्शन’ला मिळेनात प्रवासी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पुणे - पीएमपीची ‘पुणे दर्शन’ आणि ‘विमानतळ बस सेवा’ प्रवाशांअभावी कोलमडली आहे. पीएमपीच्या दहा एसी बसपैकी दोन बस बंद करण्यात आल्या आहेत. तर, पुणे दर्शनच्या दोन बसपैकी एक बस आठवड्यातून चार दिवस बंद करण्यात आली आहे.

विमानतळ बस सुविधा सुरू असली तरी, प्रवास भाडे आणि वेळेत होणारा बदल यांमुळे प्रवाशांची संख्या कमी झालेली आहे. प्रवासी खासगी वाहनांचा वापर करीत असल्याने प्रवासी संख्या घटली आहे. एसी बसमधील दोन बस दोन ते तीन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. पुणे दर्शनसाठी प्रशासनाने दोन बस सुरू केल्या आहेत. त्यातील एक बस  प्रवाशांच्या संख्येअभावी सतत रद्द करण्यात येत आहे. गुरुवार, शनिवार आणि रविवार सोडता या बससाठी प्रवासी मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच ते दहा लोकांनी या बसचे तिकीट बुक केले असले तरी, त्यांच्यासाठी बस सोडली जाते. त्यामुळे प्रशासनास तोटा सहन करावा लागतो.

पुणे दर्शन सेवेसाठी प्रवाशांच्या संख्येनुसार बस सोडल्या जातात. गुरुवार, शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी दोन बस सोडल्या जातात. अन्य दिवशी प्रवाशांची संख्या कमी असल्याने एक बस सोडली जाते. 
- दत्तात्रेय माने, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

Web Title: Pune Darshan Bus Passenger