ड्रेनेज कामात हलगर्जीपणा? पुण्यात दारूवाला पुलाजवळ ड्रेनेजचे काम सुरू असताना खांब कोसळला, शाळकरी मुलगी रक्तबंबाळ

Pune Drainage Work : ही घटना घडताच कसबा पेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. काम सुरू असताना योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी ठेकेदार आणि महापालिकेवर केला आहे.
Pune Accident News
Pune Accident Newsesakal
Updated on

पुणे (कसबा पेठ) : शहरातील दारूवाला पुलाजवळ (Daruwala Bridge) सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामादरम्यान (Pune Drainage Work) एक लोखंडी खांब अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका शाळकरी मुलीच्या डोक्यावर खांब पडल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. सध्या तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com