

वालचंदनगर : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील महिलांनी सुरू केलेल्या शरद समृद्धी महिला नियोजन पतसंस्थेस अडीच लाख रुपयांची मदत देऊन महिलांची दिवाळी गोड केली. या देणगीचा उपयोग सभासद नोंदणीसाठी करण्यात येणार आहे.
इंदापूर तालुका अंगणवाडी सेविकांनी एकत्र येऊन पतसंस्था सुरू केली आहे. सदरची पतसंस्था आखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी संघटनेशी संलग्न आहे. गेल्या आठवड्यामध्ये अंगणवाडी सेविकांनी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची भेट घेऊन सहकार्य करण्याची मागणी केली होती. आज रविवार ता. ३१ रोजी राज्यमंत्री भरणे यांनी भरणे यांनी अडीच लाख रुपये देण्याचा निर्णय घेऊन अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड केली.
या मदतीचा उपयोग सभासद नोंदणीसाठी होणार आहे. यावेळी बोलताना भरणे यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचे कार्य कौतुकास्पद आहे. कोरोना च्या काळामध्ये उल्लेखनीय काम केले आहे. तालुक्यातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी भविष्यात विविध योजना राबवणार असल्याचे सांगितले.यावेळी इंदापूर तालुका अंगणवाडी संघटनेच्या तालुकाध्यक्षा बकुळा शेंडे,उपाध्यक्षा सुदर्शना भुजबळ,सचिव बालिका राऊत यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यासंदर्भात अंगणवाडी संघटनेचा अध्यक्ष बकुळा शेंडे यांनी सांगितले की अंगणवाडी सेविका मानधन वरती काम करत आहेत. त्यांना कर्ज मिळण्यासाठी अनंत अडचणी होत्या. आम्ही एकत्र येऊन तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये संस्था सुरू केली आहे. भरणे मामानी केलेल्या मदतीचा उपयोग सभासद नोंदणीसाठी करणार आहे. एका अंगणवाडी सेविका ला सभासद नोंदणीसाठी एक हजार रुपयांची गरज होती. मामांच्या सहकार्याने अडीचशे महिलांची सभासद नोंदणी झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.