esakal | Video: दौंड येथे इमारतीच्या छतावर कोसळली वीज
sakal

बोलून बातमी शोधा

Daund

Video: दौंड येथे इमारतीच्या छतावर कोसळली वीज

sakal_logo
By
प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड शहराला लागून असलेल्या लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीत एका घराच्या छतावर वीज कोसळली. वीज कोसळतानाचा व्हिडिओ वायरल झाला आहे. शहर आणि परिसरात ६ ऑक्टोबर रोजी दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.

लिंगाळी मधील बालाजीनगर- समर्थनगर रस्त्यावर हौसा रेसीडेंसी शेजारी शंकर जाधव यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्याच्या छतावर वीज कोसळली. वीज कोसळताच आग लागून धूर निघाला व त्यामुळे छताच्या संरक्षक भिंतीचा काही भाग निखळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही काळासाठी घबराट निर्माण झाली होती.

loading image
go to top