esakal | पुणे-दौंड लोकल उद्यापासून सुरू होण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-दौंड लोकल उद्यापासून सुरू होण्याची शक्यता

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवरील लॉकडाऊननंतर शहर हळूहळू पूर्वपदावर येत असल्यामुळे शहरातील विविध प्रकारच्या अत्यावश्‍यक सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची ये-जा करण्याची मात्र गैरसोय होत आहे.

पुणे-दौंड लोकल उद्यापासून सुरू होण्याची शक्यता

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे ते दौंड या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पुणे ते दौंड व दौंड ते पुणे या लोकल सेवा २० ऑक्‍टोबरपासून सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यादृष्टीने पुणे पोलिसांकडून महापालिकेसह विविध शासकीय विभागांशी संपर्क साधण्यात आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवरील लॉकडाऊननंतर शहर हळूहळू पूर्वपदावर येत असल्यामुळे शहरातील विविध प्रकारच्या अत्यावश्‍यक सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची ये-जा करण्याची मात्र गैरसोय होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे ते दौंड व दौंड ते पुणे लोकल सेवा सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोकल सेवेची वेळ 
पुणे ते दौंड : सकाळी सहा वाजता व सायंकाळी ५.२० मिनिटांनी
दौंड ते पुणे : सकाळी पावणे आठ व सायंकाळी सव्वा सात वाजता

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ई-पाससाठीची नोंदणी
कर्मचाऱ्यांनी www.punepolice.gov.in या लिंकवर जाऊन ई-पास मिळण्यासाठी आपल्या कार्यालयाचे पत्र, ओळखपत्र, छायाचित्र, फिटनेस सर्टिफिकेट व इतर माहिती अर्जदाराने ऑनलाइन भरून द्यायची आहे. पोलिस आयुक्तालयामार्फत संबंधित अर्जाची पडताळणी केल्यानंतर अर्जदाराला प्रवासासाठीचा  क्‍यूआर कोड आधारित ई-पास उपलब्ध होईल.

loading image