"डीएमयू' नको; लोकल हवी 

हितेंद्र गद्रे
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

पुणे-दौंड लोकल सेवा सुरू करण्याची सर्वच प्रवाशांना अपेक्षा आहे. मात्र, ती सुरू केव्हा होणार? याची उत्सुकता आहे.

यवत - पुणे-दौंड लोकल सेवा सुरू करण्याची सर्वच प्रवाशांना अपेक्षा आहे. मात्र, ती सुरू केव्हा होणार? याची उत्सुकता आहे.  मात्र, दोन वर्षांपूर्वी "डीएमयू' सुरू झाल्याने थोडा आनंद आणि अधिक निराशा, अशा प्रकारच्या प्रवाशांच्या भावना आहेत. आजही "डीएमयू'ऐवजी लोकल सेवा सुरू व्हावी, अशीच प्रवाशांची मागणी आहे. लोकल सुरू झाल्यावर प्रवाशांनी व मासिक पासधारकांची संख्या निश्‍चित वाढणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाहनतळांची गरज 
पुणे-दौंड लोहमार्गावरील बहुतांश स्टेशनवर वाहनतळ ही प्रमुख समस्या आहे. या मार्गावरील केडगाव व उरुळी कांचन वगळता उर्वरित स्टेशन लोकवस्तीपासून दूर आहेत. तेथे नियमित प्रवाशांना आपली वाहने आणावीच लागतात. मात्र, खुटबाव, यवत यांसारख्या स्टेशनला पार्किंगसाठी खासगी जागेचा वापर करावा लागत आहे. तसेच वाढत्या गर्दीनुसार स्टेशनच्या फलाटांना पूर्ण छत बांधण्याची गरज प्रवासी व्यक्त करीत आहेत. 

सध्या पुणे ते लोणावळा लोकल सेवा सुरू आहे. ती तशीच दौंडपर्यंत पुढे वाढवणे शक्‍य आहे. यामध्ये काही गाड्यांची वाढ केली पाहिजे. मुंबई-पुणे अनेक रेल्वेगाड्या असतानाही सध्या लोणावळा-पुणे लोकलसेवेला मोठा प्रतिसाद आहे. त्यापेक्षाही चांगला प्रतिसाद दौंड-लोणावळा लोकलला मिळू शकतो. 
- राजेंद्र कांबळे, रेल्वे प्रवासी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune daund local train

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: